GST नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रं Documents Required for GST Registration

GST नोंदणी करायची आहे, पण कोणती कागदपत्रं लागतात याबद्दल संभ्रमात आहात का?
या ब्लॉगमध्ये आपण सविस्तर, पण अगदी सोप्या भाषेत पाहू की व्यवसायाच्या प्रकारानुसार कोणती कागदपत्रं लागतात, आणि नोंदणीसाठी कोणती काळजी घ्यावी.

🧾 सर्वसाधारणपणे लागणारी कागदपत्रं (Common Documents Required):

कागदपत्र (Document)कारण (Purpose)
पॅन कार्ड (PAN Card)व्यवसायाची ओळख
आधार कार्ड (Aadhaar Card)ओळख व पत्ता पुरावा
बँक पासबुक / कॅन्सल चेक (Bank Details)बँक खात्याची नोंद
मोबाईल नंबर व ईमेल आयडीOTP व कम्युनिकेशनसाठी
फोटो (Passport Size Photo)प्रोप्रायटर / डायरेक्टरचा फोटो
व्यवसायाचा पत्त्याचा पुरावामालकी हक्क किंवा भाडे करारनामा

💼 व्यवसायाच्या प्रकारानुसार लागणारी कागदपत्रं:

1️⃣ Sole Proprietorship (स्वतःचा व्यवसाय)

  • वरील सर्व कागदपत्रं
  • दुकानाचे नाव व व्यवसायाची माहिती
  • दुकानाचा पत्ता – भाडे करारनामा किंवा वीजबिल

2️⃣ Partnership Firm

  • पार्टनरशिप डीड (Partnership Deed)
  • सर्व पार्टनर्सचे पॅन व आधार कार्ड
  • एक पार्टनर अधिकृत साइनिंग अथॉरिटी असल्याचा पत्र

3️⃣ Private Limited Company / LLP

  • कंपनीचा पॅन व इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट
  • MOA आणि AOA (Memorandum and Articles of Association)
  • डायरेक्टर्सची माहिती व फोटो
  • बोर्ड रिझोल्युशन – अधिकृत साइनिंग अथॉरिटीसाठी

🏠 व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा (Address Proof):

टाईपकाय लागेल?
मालकीचा पत्तावीजबिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसीट इ.
भाड्याचा पत्ताभाडे करारनामा (Rent Agreement) + मालकाचे वीजबिल
को-वर्किंग स्पेससब-लायसन्स करार किंवा स्पेस अलॉटमेंट लेटर

काही अतिरिक्त टीप्स:

  • सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून PDF मध्ये तयार ठेवा
  • मोबाईल नंबर व ईमेल OTP साठी अ‍ॅक्टिव्ह असावेत
  • Rent Agreement 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा
  • Bank पासबुकमध्ये व्यवसायाचं नाव असेल तर उत्तम
  • Signature साठी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर (DSC) लागतो का, हे तपासा – खासकरून Pvt Ltd साठी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

Q. दुकान लहान आहे, तरीही Rent Agreement लागतो का?
होय, GST नोंदणीसाठी पत्त्याचा पुरावा अत्यावश्यक असतो – मग तो दुकान लहान असो वा मोठं.

Q. माझ्याकडे स्वतःचा पत्ता नाही, घरीच व्यवसाय करतो – तरी चालेल का?
होय, चालेल. घराचा पत्ता वापरूनही नोंदणी करता येते – फक्त पुरावा आवश्यक आहे.

Q. डिजिटल सिग्नेचर लागतो का?
Pvt Ltd आणि LLP ला Digital Signature Certificate (DSC) अनिवार्य आहे. Sole Proprietor ला लागतोच असं नाही.


📞 नोंदणीसाठी तज्ज्ञांची मदत हवी आहे का?

Business Mitra तुमचं काम सोपं करतो!
सर्व कागदपत्रांची तपासणी, अर्ज, फॉलोअप – सगळं आम्ही सांभाळतो.

📲 संपर्क करा: 9594965755
🌐 www.businessmitra.in

Share this Post

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

Composition Scheme म्हणजे काय? कोण त्यात सहभागी होऊ शकतो? What is GST Composition Scheme? Eligibility, Benefits

🧠 Composition Scheme म्हणजे काय? GST मध्ये Composition Scheme ही एक सरल करप्रणाली (Simplified Tax Scheme) आहे, जिथे व्यापाऱ्याला फक्त एका ठराविक टक्केवारीने Tax भरावा

Read More »
gst late fees marathi

GST Return वेळेवर न भरल्यास काय दंड होतो? Late Fees and Interest in GST

“Return भरायचं विसरलो” किंवा “थोडं उशीर झाला, काही हरकत नाही”…असं जर वाटत असेल, तर थांबा! कारण GST मध्ये Return उशीराने भरल्यास सरकार थेट दंड (Late

Read More »

Why Business Mitra ?

Professional Team

Our professional team offers expert legal and tax support for startups, helping you navigate complexities with ease.

Timely Execution

We ensure timely execution of your legal and tax tasks, so you can focus on growing your business.

Honest Advice

We offer honest advice to help you make informed decisions for your startup.

Transparent Pricing

We offer transparent pricing with no hidden fees, so you know exactly what to expect.

Client Testimonials