केवळ 30 दिवसांत गोल्ड लोन कंपनी कशी सुरू करावी ?

तुम्हाला माहित आहे का ? भारत हा जगात सोने आयात करणारा सर्वात मोठा देश आहे आणि भारतातल्या घरामध्ये सोने हे सर्वात जास्त गुंतवणुकीचे साधन आहे. या वस्तुस्थितीमुळे मुथूट फायनान्स (Muthoot Finance) सारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि याच कारणामुळे अनेक नविन उद्योजकांना गोल्ड लोन कंपनी सुरु करण्यास इच्छुक आहेत .

       तरीही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कठोर नियमांमुळे भारतातील वित्त कंपनी सुरू करणे हे तितकेसे सोपे नाही. तथापि, भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मंजूरीशिवाय गोल्ड लोन कंपनी सुरू करण्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत आणि त्यातही फक्त ५ लाख भांडवलासह (Initial Capital) सुरू करू शकतो.


निधी कंपनी – गोल्ड लोन कंपनी

        वित्त व्यवसायात(Finance Business) गुंतलेल्या सर्व बँकिंग आणि नॉन-बँकिंग कंपनी इत्यादी निधी कंपनी वगळता सर्व रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित केली जातात. निधी कंपनी हि एक एनबीएफसी (NBFC) आहे जी ठेवी स्वीकारू शकते आणि त्यांच्या सदस्यांना पैसे देऊ शकते. निधी कंपनीला केवळ ५ लाख प्रारंभिक भांडवल (Initial Capital) आणि सात सदस्यांसह सुरूवात करणे आवश्यक आहे. सोन्यावर तारणकर्ज देणारा व्यवसाय सुरू करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. निधी कंपनीचा मुख्य फायदा म्हणजे तो त्याच्या सदस्यांमधून ठेवी स्वीकारू शकतो आणि त्या पैशाचा वापर पुढील कर्जासाठी करू शकतो. निधी कंपनी हि गोल्ड लोन कंपनी म्हणूनही ओळखली जाते कारण निधी कंपनीची सर्वाधिक कमाई सोन्यावर दिलेल्या कर्जाची असते.

निधी कंपनी नोंदणीसाठी लागणारी किंमत आणि वेळ

         निधी कंपनीच्या नोंदणीसाठी ५० ते ५५ हजार रुपये इतका साधारण खर्च ५ लाख भांडवलासह होईल आणि त्याच्या नोंदणीसाठी २० दिवस लागतात. निधी कंपनी म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहू ! • निधी कंपनी ही एक पब्लिक कंपनी आहे जी ठेवी स्वीकारू शकते आणि आरबीआयच्या (RBI) मंजुरीसह आपल्या सदस्यांना पैसे देऊ शकते .• एनबीएफसी(NBFC) कंपनीला किमान रु.५ कोटी भांडवलाची आवश्यकता असते तर एनबीएफसीच्या (NBFC) तुलनेत निधी कंपनी फक्त रु. ५ लाखाने नोंदणीकृत होऊ शकते. • निधी कंपनीला प्रारंभ करण्यासाठी किमान सात सदस्यांची आवश्यकता असते आणि त्यातील संपूर्ण व्यक्ती कुटुंबातील सदस्य हि असू शकतात.• निधी कंपनी २०% व्याज दराने हि सोन्यावर कर्ज देऊ शकते.• निधी कंपनी ते ठेवींवरील कर्ज, सोन्याचे कर्ज, मालमत्ता कर्ज यावरील व्याज दर व वेळ मर्यादा देखील वाढवू शकते.• निधी कंपनी ठेवींम्हणून सावधि ठेवी (Recurring Deposits), आवर्ती ठेवी (Fixed Deposits) आणि बचत ठेवी (Savings Deposit) स्वीकारू शकतात ज्यावर १२.५० % इतका जास्तीत जास्त व्याज दिला जातो.
गोल्ड लोन कंपनीची नोंदणी – पायऱ्या     आता आपल्याला निधी कंपनीचा अर्थ समजला असेलचं, निधी कंपनीची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पुढे जाऊयात. साध्या समजण्यासाठी, आम्ही निधी नोंदणी प्रक्रिया पाच भागमध्ये स्पष्ट केली आहे:


. सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करणे.

     निधी कंपनीची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि म्हणूनच सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन फॉर्मवर अपलोड केल्या जातात. शिवाय, बाद अर्ज टाळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची शिफारस केली जाते. निधी कंपनी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिली आहे:

  • पॅन कार्ड
  • आयडी पुरावा (ID Proof)
  • बँक स्टेटमेंट, मोबाईल बिल, लँडलाइन बिल – या पैकी कोणतेही एक

पुढे, नोंदणीकृत कार्यालयासाठी खालील अतिरिक्त कागदपत्रे आवश्यक आहेत:• मालकी पुरावा / भाडे करार

  • नाहरकत प्रमाणपत्र • वीज बिल

वरील कागदपत्रे प्रत्येक निधी कंपनी सुरू करनाऱ्या व्यक्तिने (प्रमोटरने) गोळा केली पाहिजे आणि स्कॅन करून ठेवली पाहिजे.

 

. कंपनीचे  ना मंजूर करणे.

       एकदा कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर, पुढील टप्पा हा कंपनीच्या नावाच्या मंजूरीसाठी अर्ज करणे हा आहे. नाव मंजूर करणे ही महत्वाची गोष्ट आहे कारण ते असे नाव आहे जे आपल्या कंपनीचे वर्णन करते आणि अखेरीस कंपनीचे ब्रँड बनते आणि म्हणूनच आपल्या कंपनीचे नाव ठरविण्यासाठीची माहिती पुढीलप्रमाणे :

  • कंपनीचे नाव हे सर्वांसारखे नसावे ते वेगळे असावे आणि सध्या अस्तित्वात असलेल्या एखाद्या कंपनीच्या नावाशी ते जुळू नये.
  • आपल्या प्रस्तावित कंपनीच्या नाव हे कोणत्याही नोंदणीकृत ब्रँडच्या नावाची कॉपी केली नसावी. म्हणूनच, नाव निश्चित करण्यापूर्वी ३६ वर्गाच्या (class 36) खाली योग्य ट्रेडमार्क शोधावा.
  • आपले नाव भारत निधी लिमिटेड, मनी निधी लिमिटेड आणि बेस्ट निधी लिमिटेड इ. सारखे सामान्य असू नये.
  • कंपनीचे नाव खालील स्वरुपात असावे:

      ब्रँड (प्रत्यय) + निधि (प्रत्यय) + मर्यादित / लिमिटेड.एकदा आपले निवडलेले नाव मंजूर झाल्यानंतर, आरओसी (ROC) नावमंजूर पत्र जारी करेल.

३. निधी कंपनी स्थापणेसाठी (Incorporation ) फाइल.

       संमती पत्र मिळाल्यानंतर ते पत्र एमसीएकडे (MCA) निधी कंपनीच्या नोंदणीसाठी दाखल करावे. निगमाच्या प्रक्रियेतील ही शेवटची पायरी आहे परंतु या प्रक्रियेस थोडा अवधी लागतो बहुदा काही नवीन कागदपत्रे तयार केली जातात, स्वाक्षरी केली जातात आणि रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC) कडे सादर केली जातात.    जर सर्व कागदपत्रे बरोबर असल्याचे आढळल्यास रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC) कंपनीच्या पॅन आणि टॅनसह निधी कंपनीसाठी नोंदणी प्रमाणपत्र जारी करेल.
. बँक खाते उघडा आणि सुरवातीला लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करा.       निधी कंपनीची नोंदणी झाल्यानंतर आता आपण  सोने तारण  कर्ज (Gold Loan) व्यवसाय सुरू करण्यास सज्ज आहात. तसेच, प्रारंभ करण्यापूर्वी,आपल्याला काही गोष्टी व्यवस्थितपणे मांडणी करण्याची आवश्यकता आहे  ज्यामुळे आपण निधी कंपनी व्यवहार आणि सोने कर्जावर स्केल करू शकता, आपल्या आवडीच्या बँकेसह बँक खाते उघडा. बँक खाते उघडण्यासाठी आपल्याला खालील कागदपत्रे आवश्यक आहेत म्हणून त्यांना तयार ठेवा:

o          MOA

o          AOA

o          Certificate of Incorporation

o          Director Pan and ID proof

o          Board resolution

• प्रारंभिक भांडवल (Initial Capital )जमा करा: एकदा बँक खाते उघडले की, सर्वसाधारण लोकांना सोन्याचे कर्ज देणे सुरू करण्यासाठी बँक खात्यात रु. ५ लाखांची रक्कम जमा करा.

  • छापील स्वरुपात सदस्यता, कर्ज आणि ठेव फॉर्म बनवा. (Membership, Loan and deposit forms):

 ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि केवायसी (KYC) पूर्ण करण्यासाठी, आपल्याला काही इतर मूळ स्टेशनरीसह कर्ज व ठेव फॉर्म आणि कर्ज करार आवश्यक असेल. ते तयार करा.

५. निधी सॉफ्टवेअर सेट अप करा आणि सुरू करण्यासाठी तयार व्हा !

        एकदा आपण मूलभूत स्टेशनरीसाहित्यासह तयार झाल्यानंतर, निधी कंपनीसाठी सॉफ्टवेअर सेट अप करा आणि आपल्या ग्राहकांचे सर्व खाते एकाच सॉफ्टवेअरमध्ये जोडण्यासाठी व्यवस्थापित करा. सोने कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी सॉफ्टवेअर ऑफर करणारे अनेक कंपन्या आहेत आणि म्हणूनच आपण सर्व वैशिष्ट्ये तपासा आणि  सॉफ्टवेअर खरेदी करणे आवश्यक आहे.एकदा का, सॉफ्टवेअर देखील योग्यरित्या स्थापित केले आहे, आपण जगावर राज्य करण्यास तयार आहात !. 

अधिक माहितीसाठी  बाजूला दिलेला फॉर्म (Get a Call Back ) भरा. आमचा प्रतिनिधी लवकरच तुम्हाला संपर्क करेल.

-MyBizMitra.com

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp

Leave a Comment

Your email address will not be published.

Categories

Get Call Back

Related Posts

AIS
Income Tax

AIS अर्थात अन्युअल इन्फॉर्मशन स्टेटमेंट

आयकर खात्याची एक मोठी स्टेप ज्यामुळे सर्वसामान्य लोकांची पण झोप उडाली आहे. आयकर खात्याच्या वेब पोर्टल वर वर्षभरात केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा उघड करण्यात आला आहे. यामुळे करदाते

Read More »
Business Stories

लहान व्यवसायाची कथा

चिकपेट , बेंगलोर हे बंगलोर शहरातील 1000 हून अधिक दुकानांसह व्यवसाय केंद्र म्हणून ओळखले जाते. घाऊक किंमतीवर (Wholesale  Price) कपडे, फर्निचर, खेळण्या इत्यादी खरेदी करण्यासाठी असंख्य लोक नेहमीच गर्दी असते. काल,

Read More »
Company Registration

केवळ 30 दिवसांत गोल्ड लोन कंपनी कशी सुरू करावी ?

तुम्हाला माहित आहे का ? भारत हा जगात सोने आयात करणारा सर्वात मोठा देश आहे आणि भारतातल्या घरामध्ये सोने हे सर्वात जास्त गुंतवणुकीचे साधन आहे. या वस्तुस्थितीमुळे मुथूट फायनान्स (Muthoot

Read More »
0 +
Happy Clients
0 +
Business Registered
0 +
Business Loan
0 +
trained People
Based on 17 reviews.
Prachi Patil
Prachi Patil
29. June, 2021.
Verified
Business Mitra आमचे गेली 4 वर्ष Gst/इनकम टॅक्स काम करत आहेत, त्याचा कामाबद्दल आम्ही पूर्ण समाधानी आहोत. 5स्टार देण्यामागचे कारण म्हणजे काम वेळेवर पूर्ण करतात, काम करताना येणाऱ्या शंका निरसन होते, सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्ययसायत मित्रा प्रमाणे मदत होते.
pokalenandu
pokalenandu
23. June, 2021.
Verified
Devram Kasurde
Devram Kasurde
23. June, 2021.
Verified
Sudhir Birla
Sudhir Birla
23. June, 2021.
Verified
Harshal Satale
Harshal Satale
23. June, 2021.
Verified
Prakash Gajendran
Prakash Gajendran
23. June, 2021.
Verified
swapnil jadhav
swapnil jadhav
23. June, 2021.
Verified
Ramchandra Ghagare
Ramchandra Ghagare
23. June, 2021.
Verified
Rohit patil
Rohit patil
23. June, 2021.
Verified
Shriyash Jadhav
Shriyash Jadhav
23. June, 2021.
Verified

Get Call Back