AIS अर्थात अन्युअल इन्फॉर्मशन स्टेटमेंट

AIS

आयकर खात्याची एक मोठी स्टेप ज्यामुळे सर्वसामान्य लोकांची पण झोप उडाली आहे.

आयकर खात्याच्या वेब पोर्टल वर वर्षभरात केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा उघड करण्यात आला आहे. यामुळे करदाते जे व्यवहार लपवत होते ( मुख्यतः शेअर चे व्यवहार) ते आता त्यांना त्यांच्या ITR मध्ये दाखवणे क्रमप्राप्त होणार आहे.

इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर AIS अर्थात अन्युअल इन्फॉर्मशन स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. यात नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची माहिती टाकण्यात आली असून ही माहिती न पाहताच कोणी इनकम टॅक्स रिटर्न भरले असेल तर ते चुकीचे ठरण्याची शक्यता आहे. कारण आयकर विभाग रिटर्न प्रोसेस करताना AIS मधील माहितीशी रिटर्नमधील माहिती जुळते का याची पडताळणी करणार आहे. AIS मधील माहितीमुळे करचोरीच्या बहुतांश पळवाटा बंद झाल्या आहेत.

पूर्वी 26 AS मध्ये जो डेटा उपलब्ध होता त्यात नव्या AIS मध्ये मोठी भर टाकण्यात आली असून यापुढे आपले रिटर्न जाणकार व्यक्तीकडून भरून घेणे सोयीस्कर राहणार आहे, त्यासोबत आर्थिक व्यवहार करताना अतिशय दक्ष राहणे आवश्यक झाले आहे, कर चुकवून लपूनछपून केले जाणारे आर्थिक व्यवहार त्यामुळे कमी होतील. AIS मध्ये असे काय “स्फोटक “आहे?

1) कोविडनंतर देशभरात जवळपास 2 कोटी नवे डिमॅट अकाउंट सुरु झाले. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात मोठ्या उलाढाली झाल्या. या प्रत्येक व्यवहाराची माहिती AIS मध्ये आली आहे. नफा, तोटा, डिव्हिडंड अशी सर्व माहिती आयकर खात्याकडे असल्यामुळे त्याची नोंद न घेता भरलेले रिटर्न नोटीशीला निमंत्रण देऊ शकते. कॅपिटल गेन किंवा लॉसची माहिती भरूनच आपले रिटर्न भरावे लागेल, अन्यथा आपण माहिती लपूविल्याचे सिद्ध होऊन नोटीस येऊ शकते.

2) बँकेतील एफडीवरील व्याज 26 AS मध्ये येत होते. AIS मध्ये त्यासोबतचं बचत खात्यावरील व्याजही समाविष्ट झाले आहे. बचत खात्यावरील 10 हजारापर्यंतच्या व्याजावर आयकर सूट असली तरी 10 हजारापुढील व्याज हे आपले करपात्र उत्पन्न असल्याने त्याची रिटर्नमध्ये नोंद देणे बंधनकारक आहे. एफडीवरील व्याजासोबत आता बचत खात्याचे व्याजही आपल्या उत्पन्नात समाविष्ट करून आपल्या इनकम टॅक्स स्लॅबप्रमाणे त्यावर करही भरणे बंधनकारक आहे. त्यामुळेच सर्व बचत खात्यावरील व्याज उत्पन्न म्हणून दाखवणे गरजेचे आहे.

3) कोविडनंतर अनेक ऑनलाईन व्यवहार वाढले. त्यामुळे आपल्या बँक बचत खात्यावर मोठया उलाढाली होतात. ही उलाढाल आणि खात्यावर ऑनलाईन जमा झालेली रक्कम याची नोंद बँक खात्यात होते, हा डेटाही आयकर खात्याकडे जातो. आपल्या खात्यावर होणाऱ्या 10 लाखापेक्षा अधिक ऑनलाईन व्यवहाराचा हिशोब ठेवावा लागेल. ऑनलाईन व्यवहार संशयस्पद वाटले तर हे पैसे कुणाकडून आणि कशासाठी आले याची माहिती आयकर खाते आपल्याला मागू शकते. आपण ब्यावसायिक असाल तर ऑनलाईन व्यवहारासाठी करंट खात्याचा वापर करणे योग्य ठरेलं.

4) स्थावर मालमत्ता म्हणजे फ्लॅट, प्लॉट, दुकान गाळे अशा मालमत्ता खरेदी आणि विक्रीची माहितीही AIS मध्ये देण्यात आली आहे. या व्यवहारात कुणी उत्पन्न स्रोतापेक्षा अधिक रकमेची खरेदी केली असेल तर आयकर खाते त्याची चौकशी करू शकते. विक्री व्यवहारात कॅपिटल गेनची नोंद घेऊनचं रिटर्न भरणे महत्वाचे आहे कारण AIS मध्ये आपल्या व्यवहाराची नोंद झाल्यामुळे माहिती न देता रिटर्न भरणे चुकीचे ठरुन आपल्याला नोटीस येऊ शकते.

5) स्थावर मालमत्ता व्यवहाराच्या AIS मधील नोंदीचा होम लोनशीही संबंध येतो. कारण घर ही देखील स्थावर मालमत्ता आहे. होम लोनची वजावट घेऊन कर वाचविणाऱ्या काही लोकांनी एकापेक्षा अधिक प्रॉपर्टीवर लोन घेऊन वजावट मिळविली असेल तर आपल्या प्रॉपर्टीची नोंद आयकर खात्याकडे आहे, हे लक्षात ठेवायला हवे. अनेकजण रिटर्न दाखल करताना कर्ज घेतलेले घर राहते असल्याचे दाखवून होम लोनची वजावट मिळवितात. दोन प्रॉपर्टी असतील तर राहती प्रॉपर्टी सोडून दुसरी प्रॉपर्टी भाड्याने दिली असेल किंवा रिकामी असेल तरी तशी नोंद रिटर्नमध्ये करणे आवश्यक आहे. काहीजण याला फाटा देऊन आपले रिटर्न सादर करतात. त्यांनाही AIS मधील माहितीमुळे असे करणे यापुढे महागात पडू शकते.

Big Relief for Taxpayer, AIS data Not to be used for Income Tax Calculation  says CBDT - Faceless Compliance

6) होम लोन दोघांच्या नावे घेतलेले असेल तर त्याचीही माहिती रिटर्नमध्ये देणे आवश्यक आहे. एकाच प्रॉपर्टीच्या होम लोनवर वजावट घेताना प्रॉपर्टीच्या दोन्ही भागीदारांनी नियमानुसार आपल्या हिश्श्याची नोंद ठेवायला आणि द्यायला हवी, इतकेच काय प्रॉपर्टीचा पत्ता, बिल्ट अप एरिया याची माहितीही आयकर खात्याला अपेक्षित आहे. AIS मधील माहितीच्या आधारे आयकर खाते आवश्यक वाटले तर या साऱ्याची चौकशी करू शकते.

7) विविध मार्गाने आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यासाठी काहीजण कमिशन, ब्रोकरेज या मार्गाने उत्पन्न वाढविणारे व्यवसाय करतात. या लोकांचे या मार्गाने येणारे उत्पन्नदेखील AIS मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्याची नोंद देखील रिटर्नमध्ये देणे आवश्यक आहे. असे वेगवेगळे उत्पन्नस्रोत असलेल्या लोकांसाठी रिटर्न फॉर्म देखील वेगळे आहेत. विशेष करून वेतन हेचं मूळ उत्पन्न असलेल्या कर्मचारी वर्गाने याची नोंद घ्यायला हवी, आणि दक्षही राहायला हवे. उत्पन्न वाढविताना आपण कोणत्या नीतीनियमाचा भंग तर करीत नाही ना? याची देखील काळजी घ्यायला हवी.

8) दीड दोन टक्के जास्तीच्या व्याजासाठी फायनान्स, आर्थिक संस्था आणि पतपेढ्यात मोठ्या रकमा गुंतविणारे लोक आहेत. गेल्या 10 – 12 वर्षांत कोट्यवधीचा गंडा बसूनही बरेच जण गाफिल आहेत. आता अशा संस्थातील डेटादेखील सरकार AIS साठी मागू शकेल, कदाचित पुढील वर्षांत पतपेढ्या, फायनान्स, पोस्ट खाते यांचाही डेटा AIS मध्ये येऊ शकेल. ठेवीवर व्याज देणे आणि घेणे चुकीचे नाही पण त्याची माहिती आपल्या रिटर्नमध्ये देऊन व्याजावर टॅक्स बसत असेल तो भरणे सरकारला अपेक्षित आहे.

9) आर्थिक व्यवहार करताना 10हजारावरील रकमेसाठी चेकचा वापर बंधनकारक आहे. पण काही ठिकाणी अजूनही 10हजारावरील मोठमोठे व्यवहारदेखील रोखीने केले जातात. ऑनलाईन भरलेल्या रिटर्नचीदेखील स्क्रूटेनी करण्याचा अधिकार आयकर खात्याला आहे. त्यामुळे नियम डावलून केलेले आर्थिक व्यवहार यापुढे महागात पडू शकतात.

10) बरेच जण बचत खात्यात एकावेळी 50000 पेक्षा जास्त रक्कम भरतात किंवा काढतात. किंवा बचत खात्यात वर्षभरात वेळोवेळी 10लाखापेक्षा जास्त रोख रक्कम भरली तरी त्यांना आयकर खात्याकडून नोटीस येऊ शकते.वर्षभरात केलेले कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार यापुढे आयकर खात्याला कळण्याची सोयचं AIS च्या माध्यमातून सरकारने केली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारातील पारदर्शीता वाढीस लागेल, हे निश्चित!त्यामुळे काळजी घ्या व आपले सर्व आर्थिक व्यवहार ITR मध्ये दाखवले जातील याची खात्री करा. आयकर खात्याचे हे नक्कीच धाडसी पाऊल आहे व दरवर्षी यात नक्कीच सुधारणा होई

Only for information under awareness program

#incometaxreturnBusiness Mitra#business

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp

Leave a Comment

Your email address will not be published.

Categories

Get Call Back

Related Posts

AIS
Income Tax

AIS अर्थात अन्युअल इन्फॉर्मशन स्टेटमेंट

आयकर खात्याची एक मोठी स्टेप ज्यामुळे सर्वसामान्य लोकांची पण झोप उडाली आहे. आयकर खात्याच्या वेब पोर्टल वर वर्षभरात केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा उघड करण्यात आला आहे. यामुळे करदाते

Read More »
Business Stories

लहान व्यवसायाची कथा

चिकपेट , बेंगलोर हे बंगलोर शहरातील 1000 हून अधिक दुकानांसह व्यवसाय केंद्र म्हणून ओळखले जाते. घाऊक किंमतीवर (Wholesale  Price) कपडे, फर्निचर, खेळण्या इत्यादी खरेदी करण्यासाठी असंख्य लोक नेहमीच गर्दी असते. काल,

Read More »
Company Registration

केवळ 30 दिवसांत गोल्ड लोन कंपनी कशी सुरू करावी ?

तुम्हाला माहित आहे का ? भारत हा जगात सोने आयात करणारा सर्वात मोठा देश आहे आणि भारतातल्या घरामध्ये सोने हे सर्वात जास्त गुंतवणुकीचे साधन आहे. या वस्तुस्थितीमुळे मुथूट फायनान्स (Muthoot

Read More »
0 +
Happy Clients
0 +
Business Registered
0 +
Business Loan
0 +
trained People
Based on 17 reviews.
Prachi Patil
Prachi Patil
29. June, 2021.
Verified
Business Mitra आमचे गेली 4 वर्ष Gst/इनकम टॅक्स काम करत आहेत, त्याचा कामाबद्दल आम्ही पूर्ण समाधानी आहोत. 5स्टार देण्यामागचे कारण म्हणजे काम वेळेवर पूर्ण करतात, काम करताना येणाऱ्या शंका निरसन होते, सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्ययसायत मित्रा प्रमाणे मदत होते.
pokalenandu
pokalenandu
23. June, 2021.
Verified
Devram Kasurde
Devram Kasurde
23. June, 2021.
Verified
Sudhir Birla
Sudhir Birla
23. June, 2021.
Verified
Harshal Satale
Harshal Satale
23. June, 2021.
Verified
Prakash Gajendran
Prakash Gajendran
23. June, 2021.
Verified
swapnil jadhav
swapnil jadhav
23. June, 2021.
Verified
Ramchandra Ghagare
Ramchandra Ghagare
23. June, 2021.
Verified
Rohit patil
Rohit patil
23. June, 2021.
Verified
Shriyash Jadhav
Shriyash Jadhav
23. June, 2021.
Verified

Get Call Back